+91 8888 202243 WhatsApp
PREVIEW MODE
PAGE 1 GAP (Adjust Slider for Stamp Paper)

कारणे सदरील भाडे करारनामा (Leave and License Agreement) लिहून देतो ऐसा जे की, जालना येथील, न.भु.मा.क्र. / सर्व्हे नं. ______, फ्लॅट/घर क्र. __ __________, __________. ज्यामध्ये 2 BHK (हॉल, किचन, 2 बेडरूम) (लाईट व पाण्यासह) ही मिळकत लिहून देणार (मालक) यांच्या स्वकष्टार्जित मालकीची व कबजेवहिवाटीची आहे.

सदरची जागा माझी मला स्वतःला वापरणे नसल्याने, ती जागा मी तुम्हांस (भाडेकरूस) आज दिनांक __/__/____ पासुन ते दिनांक __/__/____ पावेतो अशा एकूण 11 महिन्यांच्या मुदतीकरीता खालील अटी व शर्तींच्या आधारे भाडेतत्वावर वापरास देत आहे.

PAGE 2 GAP (Adjust Slider)
--- (मागील पानाचा मजकूर येथे पेस्ट करू शकता) ---

● अटी व शर्ती :-

  1. सदर फ्लॅटचे मासिक भाडे दरमहा रुपये ____/- (अक्षरी ____ रुपये फक्त) ठरले असून ते लिहून घेणार यांनी दर महिन्याच्या 01 ते 10 तारखेपर्यंत लिहून देणार यांना रोखीने अथवा ऑनलाईन अदा करायचे आहे.
  2. सदर जागेची अनामत रक्कम (Security Deposit) रुपये ____/- लिहून घेणार यांनी मालकाकडे जमा केली आहे. करार संपल्यावर लाइट बिल, पाणीपट्टी किंवा फ्लॅटचे काही नुकसान (Damages) झाले असल्यास त्याची रक्कम वजा करून उरलेली रक्कम बिनव्याजी परत मिळेल.
  3. घरगुती वापर: सदरचा फ्लॅट हा केवळ राहण्यासाठी (Residential Purpose) दिला असून, तिथे कोणताही व्यापारी व्यवसाय, गोडाऊन किंवा उपद्रवी काम करता येणार नाही.
  4. नोटीस: सदर फ्लॅट कराराची मुदत संपण्यापूर्वी खाली करुन घ्यायचा अथवा द्यायचा असल्यास दोन्ही बाजूंनी एकमेकांस एक महिना अगोदर लेखी/तोंडी नोटीस देणे बंधनकारक राहील.
  5. पोलीस व्हेरिफिकेशन: स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये भाडेकरूने स्वतःचे पोलीस व्हेरिफिकेशन (Police Verification) करून त्याची प्रत मालकाकडे जमा करणे बंधनकारक राहील. कोणत्याही बेकायदेशीर कृत्यास भाडेकरू स्वतः जबाबदार राहील.
  6. न्यायकक्षा (Jurisdiction): सदर कराराबाबत भविष्यात काही वाद उद्भवल्यास त्याची सर्व न्यायकक्षा जालना येथील न्यायालयाच्या अधीन राहील.
  7. ताबा दंड (Penalty): कराराची मुदत संपल्यानंतर किंवा नोटीस दिल्यानंतरही जर भाडेकरूने जागा रिकामी केली नाही, तर त्या दिवसापासून भाडेकरूस प्रतिदिन दुप्पट भाडे दंड म्हणून द्यावे लागेल.

करीता हा भाडे करारनामा आम्ही उभयतांनी, आमचे राजीमर्जीने, अक्कलहुशारीने व कोणत्याही नशापाणी न करता, साक्षीदारांसमक्ष वाचून समजून उमजून लिहून दिला व घेतला असे.

दिनांक: __/__/____     ठिकाण: जालना

साक्षीदार :-
1) __________________
2) __________________
मालक
लिहून देणार (मालक)
भाडेकरू
लिहून घेणार (भाडेकरू)