फाईलची साईझ कमी करण्यासाठी PDF येथे अपलोड करा
ही PDF फाईल पासवर्डने लॉक केलेली आहे, कृपया ती अनलॉक करण्यासाठी खाली पासवर्ड टाका:
शासकीय फॉर्म्स, कॉलेज ॲडमिशन, किंवा ई-मेल पाठवताना अनेकदा फाईल साईझची अट असते (उदा. फाईल 2 MB पेक्षा कमी असावी). अश्या वेळी तुमच्या मोठ्या PDF फाईलची साईझ कमी करण्यासाठी DigiTools Marathi चे हे 'Smart PDF Compressor' टूल अत्यंत उपयोगी आहे. विशेष म्हणजे हे टूल अक्षरे आणि फोटो ब्लर होऊ देत नाही.
इतर सर्वसाधारण टूल्समध्ये फाईल लहान केल्यावर टेक्स्ट (अक्षरे) फाटतात. पण आम्ही 'High-DPI Scale 2.2' तंत्रज्ञान वापरतो, ज्यामुळे तुमची फाईल लहान होते पण प्रिंटसाठी अगदी स्पष्ट राहते.
तुमचे बँक स्टेटमेंट्स, आधार कार्ड किंवा खाजगी कागदपत्रे १००% सुरक्षित आहेत. फाईल तुमच्याच ब्राउझरमध्ये प्रोसेस होते, ती इंटरनेटवर आमच्या सर्व्हरला पाठवली जात नाही.
तुमच्या PDF ला पासवर्ड असेल (उदा. ई-आधार किंवा बँक स्टेटमेंट), तरीही तुम्ही ती इथे अपलोड करू शकता. टूल तुम्हाला सुरक्षितपणे पासवर्ड मागेल आणि फाईल उघडून देईल.
तुम्हाला फाईलची साईझ किती कमी करायची आहे हे तुम्ही 'Quality Slider' वापरून स्वतः ठरवू शकता. जितकी कमी टक्केवारी, तितकी लहान फाईल!
जर तुमची मूळ PDF फक्त 'टेक्स्ट' ची बनलेली असेल (ज्यात एकही फोटो नाही आणि तिची साईझ आधीच 50KB-100KB असेल), तर हे टूल तिला इमेजेस मध्ये कन्व्हर्ट करून परत PDF बनवते. अशा वेळी साईझ कमी होण्याऐवजी वाढू शकते. हे टूल विशेषतः स्कॅन केलेल्या डॉक्युमेंट्स (Images/Photos in PDF) साठी सर्वोत्तम काम करते.
होय! आमची वेबसाईट पूर्णपणे मोबाईल फ्रेंडली (Responsive) आहे. तुम्ही अँड्रॉइड किंवा आयफोन वरून हे टूल अतिशय सहजपणे वापरू शकता.